वृत्तसंस्था / व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या व्हिएन्ना खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनरने जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेवचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. सिनरने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉपसिडेड सिनरने व्हेरेवचा 3-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. हा अंतिम सामना अडीच तास चालला होता. सिनरने ही स्पर्धा यापूर्वी 2023 साली जिंकली होती. स्वीसचा रॉजर फेडरर तसेच ब्रिटनचा अॅन्डी मरे यांनी व्हिएन्ना स्पर्धा प्रत्येकी दोनवेळा जिंकल्या होत्या. 2025 च्या टेनिस हंगामात सिनरने 48 सामने जिंकले असून 6 सामने गमविले आहेत. आता तो चालु वर्षीच्या टेनिस हंगामात अखेरीस होणाऱ्या एटीपी फायनल्स स्पर्धेतील जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.









