वृत्तसंस्था/पॅरिस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरिस मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनर, जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरव तसेच कॅनडाचा फेलीक्स अॅलिसिमे यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली. दरम्यान मुसेटी, सोनेगो, कास्पर रुड यांचे आव्हान संपुष्टात आले. सिनरने बर्जसचा 6-4, 6-2 असा पराभव केला. जर्मनीच्या व्हेरवने कॅमिलो युगो केराबेलीचा 6-7 (5-7), 6-1, 7-5, कॅनडाच्या फेलीक्स अॅलिसिमेने फ्रान्सच्या मुलेरचा 5-7, 7-6 (7-5), 7-6 (7-4) असा पराभव केला.










