वृत्तसंस्था / बीजिंग
अव्वल मानांकित जेनिक सिनरने अॅलेक्स डी मिनॉरविरुद्ध कारकिर्दीतील सलग 11 वा सामना जिंकत मंगळवारी चायना ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिनरच्या 6-4, 3-6, 6-2 अशा विजयामुळे त्याने हार्डकोर्ट स्पर्धांमध्ये सलग नवव्यांदा अंतिम फेरी गाठली. बुधवारी डॅनिल मेदवेदेव किंवा लर्नर टिएन यापैकी एकाविरुद्ध होईल. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिनरने कारकिर्दीत दुसऱ्यांदा आठव्या मानांकित डी मिनॉरविरुद्ध एक सेट गमावला आणि नंतर जोरदार फोरहँड्सच्या बळावर नियंत्रण मिळविले.
गोफ उपांत्यपूर्व फेरीत
बीजिंगमधील एटीपी स्पर्धा डब्ल्यूटीए स्पर्धेसोबतच सुरू आहे आणि कोको गॉफने मंगळवारी क्वार्टरफायनमध्ये प्रवेश केला. गॉफने बेलिंडा बेन्सिकची सर्व्हिस ब्रेक केली आणि स्विस खेळाडूला 4-6, 7-6 (4), 6-2 असे हरवले. दुसऱ्या क्रमांकाच्या गॉफने 15 व्या क्रमांकाच्या बेन्सिकविरुद्ध तिचे जयपराजयाचे रेकॉर्ड 4-2 असे आहे. यापैकी तीन सामने या वर्षी झाले आहेत. ज्यात जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील गॉफचा विजय समाविष्ट आहे. पण बेन्सिकने अबूधाबीमध्ये विजय मिळवला आणि 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतीने इंडियन वेल्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.









