वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने एसपीजी संचालक अरुण कुमार सिन्हा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविला आहे. सिन्हा यांच्याकडे पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. अरुण सिन्हा हे केरळ कॅडरचे अधिकारी असून ते 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. एसपीजी सध्या केवळ पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांचा कार्यकाळ वाढविण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. 31 मे रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षासाठी एसपीजी संचालक म्हणून त्यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली जातेय, यादरम्यान त्यांना महासंचालकाचे पद अन् वेतन मिळणार असल्याचे म्हटले गेले आहे.
मागील आठवड्यात गृह मंत्रालयाने एसपीजीसाठी नव्या नियमांची अधिसूचना जारी केली होती. एसपीजी संचालक पदावर नियुक्त आयपीएस अधिकारी अतिरिक्त महासंचालक रँकपेक्षा कमी स्तरीय असू नये असे या नव्या नियमात नमूद आहे.









