वृत्तसंस्था/ सिंगापूर
सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी ही प्रसिद्ध जोडी आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार असून तंदुरुस्तीविषयीच्या चिंतांना दूर करून ते या प्रतिष्ठित स्पर्धेत पुनरागमन करतील.
जगातील ही माजी अव्वल जोडी शेवटचा सामना मार्चमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये खेळली होती. परंतु चिरागच्या पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीत त्यानी माघार घेतली. त्यानंतर सात्विकच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी सुदिरमन कपमधूनही माघार घेतली. आता पूर्णपणे तंदुऊस्त असलेली आणि यावर्षाच्या सुऊवातीला मलेशिया ओपन आणि इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचलेली ही भारतीय जोडी मलेशियाच्या चुंग होन जियान आणि मुहम्मद हैकल यांच्याविऊद्ध सलामीच्या लढतीत झुंजेल.
गेल्या आठवड्यात झालेल्या मलेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचून किदाम्बी श्रीकांतने स्वत:ला आणि गेल्या काही महिन्यांत भारतीय बॅडमिंटनवर पसरलेल्या निराशेच्या सावटाला दूर करण्यात यश मिळवले होती. जरी तो या आठवड्यात स्पर्धेत उतरणार नसला, तरी त्याची कामगिरी भारतीय खेळाडूंना प्रेरणा देईल. क्वालालंपूर येथे श्रीकांतची धडाकेबाज वाटचाल पाहिलेला एच. एस. प्रणॉय डेन्मार्कच्या रासमुस गेमकेविऊद्धच्या सामन्याने मोहिमेची सुऊवात करेल.
पहिल्या फेरीत लिन चुन-यीचा सामना करताना लक्ष्य सेनही त्याच्या तंदुऊस्तीबद्दलच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे 23 वर्षीय प्रियांशु राजावतवर पहिल्या फेरीतील सहा पराभवांनंतर आता कामगिरी करून दाखविण्याचा दबाव आहे 25 वर्षीय किरण जॉर्ज देखील अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला असून तो चीनच्या वेंग होंगविऊद्ध सलामीच्या लढतीत उतरेल. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू पहिल्या फेरीत कॅनडाच्या वेन यू झांगशी लढणार असून इतर भारतीय महिला खेळाडूंना कठीण ड्रॉचा सामना करावा लागला आहे. अनमोल खर्बचा सामना चीनची माजी ऑलिंपिक विजेती चेन यू फीशी, तर आकर्शी कश्यपचा सामना तिसऱ्या मानांकित हान यूशी होईल. मालविका बनसोडचा थायलंडच्या सुपानिदा काटेथोंग आणि रक्षिता रामराजचा सामना दक्षिण कोरियाच्या किम गा युनशी होईल.









