वृत्तसंस्था/ जकार्ता
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पहिल्या फेरीत सिंधूला चीन तैपेईच्या हेसू ची ने पराभूत केले.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीन तैपेईच्या हेसू वेन ची हिने पी. व्ही. सिंधूचा 21-15, 15-21, 21-14 असा पराभव करत विजयी सलामी दिली. चीन तैपेईच्या हेसूकडून पहिल्यांदाच सिंधूला पराभव पत्करावा लागला आहे. हा एकेरीचा सामना 70 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये भारताच्या ऋतूपमा पांडा आणि स्वेतपर्णा पांडा यांना पहिल्याच फेरीत कोरियाच्या कीम येआँग आणि याँग यांनी 12-21, 9-21 असे पराभूत केले.









