सावंतवाडी : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी मिळवली ३८ मेडल्स
रविवार दि १० सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पीयनशिप मध्ये ओकिनावा गोजूकान कराटे-डो मार्शल आर्ट असोशिएशन, सिंधुदुर्ग. या संस्थेच्या सावंतवाडी ,कुडाळ व ओरोस येथे सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणाच्या एकूण २२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात काता व कुमीते या दोन्ही खेळांमध्ये गोल्ड मेडल्स = १२, सिल्व्हर मेडल्स = ०८, व ब्रॉन्झ्स मेडल्स = १८ अशी एकूण ३८ मेडल्स मिळवली आहेत. यात मुलींमध्ये प्रांजल गावडे, हर्षवर्धिनी भगत, दिया मर्डोलकर, निहारीका मेस्री, अदिती नाटलेकर, तन्वी लुडबे, वैष्णवी चौव्हान, अक्षता वालावलकर तर मुलांमध्ये रोनक नाईक, यशदिप वाडकर, सक्षम गावडे, रिजूल परब, दिप राऊळ, निलेश राऊळ, शैलेश राऊळ, आयुष गवस, मयुरेश राऊत, पार्थ सावंत, तेजस चव्हान, इशांत पवार, ओंकार गुरव व आर्यन कदम या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना माजी सैनिक श्री दिलीप बाळकृष्ण राऊळ सरांचे मार्ग दर्शन लाभले.









