सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
Sindhudurg’s daughter magician Saloni Dhuri’s magic in the magician’s meeting!
सातव्या आंतरराष्ट्रीय जादुगार संमेलनात पटकावला तिसरा क्रमांक
मालवण तारकर्ली येथील बारावीत शिक्षण घेणारी सिंधुदुर्ग कन्या जादूगार सलोनी पांडुरंग धुरी हिने पुणे येथे पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय जादू सम्मेलनात उत्कृष्ट जादूचे प्रयोग सादर करत तिसरा क्रमांक पटकावला आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
सलोनीचे वडील पांडुरंग धुरी पोलीस खात्यात सेवा बजावत असतानाच विविध कार्यक्रमामध्ये जादूचे प्रयोग सादर करत असतात. त्यामुळे सलोनीला वाडीलासोबत जाऊन जाऊन जादू करण्याची आवड निर्माण झाली. दुसरी मध्ये असल्यापासून जादू शिकण्याचा प्रयत्न सुरू केला. वाडीलाकडूनच त्यांनी शिकून घेत तिने जादूचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. आणि तिने जादू विशारद ,जादू भूषण प्रमाणपत्र ,हॉरी हुदिनी मॅजिक कॉम्पिटीशन ट्रॉफी ,अशी विविध पारितोषिके मिळविली त्यानंतर तिचे अखिल भारतीय जादूगर परिषदेमध्ये निवड झाली व पुणे येथे नूकत्याच पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय जादू परिषदेत सलोनीने तिसरा क्रमांक मिळविला त्याबद्दल तिला मेडल ,प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
आतापर्यंत सलोनीने सुमारे 30 ते 40 जादूचे प्रयोग केलेले असून सिंधुदुर्गची कन्या सलोनी जादूगर म्हणून प्रसिध्दीस आली आहे ती आता टीव्ही स्टार जादूगर अतुल पाटील, मुंबई व जादुगार आयर्न ,पुणे यांच्याकडे अधिक मार्गदर्शनासाठी जाणार आहे.









