प्रतिनिधी/बांदा: बांदा एसटी स्टँड समोर समोरील बोगद्द्यापासून सर्कल पर्यंत गॅस पाईपलाईनचे काम चालू असल्याने सदरील बोगदा वाहतूक व येणे जाणे करिता बंद करण्यात आलेला आहे. उद्या दिनांक 15 जून 2023 पासून सर्व शाळा व महाविद्यालये सुरू होत आहेत रस्ता बंद असल्याने शाळकरी मुलांची गैरसोय होणार आहे .
बांदा येथील निमजगावाडी, गवळीटेंबवाडी तसेच वाफोली गावातून जवळपास 200 ते 300 मुले दररोज बांदा येथील वेगवेगळ्या शाळांमध्ये व कॉलेजमध्ये पाई ये-जा करत असतात व सदर विद्यार्थ्यांचा बोगद्यामधून जाण्या-येण्याचा नित्याचा व महामार्ग ओलांडण्याकरीता सुरक्षित असा मार्ग आहे. पण आज रोजी सदरचे गॅस पाईपलाईनचे काम चालू असल्याने बोगदा वाहतुकीस व येणे-जाणेस बंद केल्यामुळे सदरील विद्यार्थी हे हायवेवरून प्रवास करण्याची शक्यता आहे. तसेच लवकर जाण्याच्या उद्देशाने महामार्ग क्रॉस करण्याची देखील शक्यता व प्रयत्न होऊ शकतो. अशावेळी कोणतेही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडू नये व जोपर्यंत सदर पाईपलाईनचे काम पूर्ण होत नाही व बोगदा वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता तेथे शाळा व महाविद्यालयाच्या सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळी तेथे पोलिसांची उपस्थिती व इतर योग्य उपाययोजना करण्यात यावेत. असे लेखी निवेदन बांदा पोलीस सहा उपनिरीक्षक प्रशांत पवार यांना दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे,गुरू कल्याणकर, हेमंत दाभोलकर आदी उपस्थित होते.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन