कोल्हापूर :
तुमच्या घरावर करणी केली आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नाही. मुलाचे लग्न ठरत नाही. घरातील अघोरी शक्तींना नायनाट करण्याचे आमिष दाखवून नऊ जणाच्या टोळीने कोल्हापूरातील वृध्दास 84 लाख रुपयांना गंडा घातला होता. या प्रकरणातील संशयीत सिंधुदर्ग जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय 32, रा. सिध्दीविनायक पार्क, ओरस, ता. कुडाळ, जि. सिधुदूर्ग) हिला बुधवारी जुना राजवाडा पोलीसांनी अटक केली. गुऊवारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
शहरातील, दत्त गल्ली, गंगावेश मध्ये राहणारे सुभाष हरी कुलकर्णी (वय 77) या वृध्दाची नणुंद्रे (ता. पन्हाळा) गावात शेती आहे. या शेतीचा न्यायालयात वाद सुऊ आहे. तसेच त्याच्या मुलग्याचे लग्न होईना. त्याचबरोबर त्याना कोणत्याही कामात यश येत नव्हते. याची माहिती त्यानी आपला मावस भाऊ राजेंद्र कुलकर्णी याना दिली. त्यानीं याची माहिती संशयीत आरोपी भोळेला दिली. त्यानंतर त्याच्या घरात 13 फेब्रुवारी,2023 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संशयीत दादा पाटील महाराज–पाटणकर, आण्णा उर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील उर्फ धनश्री काळभोर, गोळे, कुंडलिक झगडे, पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक, ओंकार, भरत, हरीष अशा नऊ जणाचे टोळके आले. त्यानी त्याना तुमच्या घरात अघोरी शक्ती असल्याने, तुमची प्रगती होत नसल्याचे सांगून, विश्वास संपादन केला. या वृध्दावर त्याच्या घरच्यावर दबाब व भिती घालुन घरी विधी पुजा कऊन, शापीत बंधन काढणे, सोन्या–चांदीच्या दागिण्याचे शुद्दीकरण करणे आवश्यक आहे. तर तुम्ही असे केले नाहीत तर तुमचे फोटो भितीवर लागतील आक्ष भिती घालुन, त्याच्याकडील सोने, चांदीचे दागिणे, परवान्याची बंदुक, घरातील जुने सिसम सागवानचे किंमती लाकडी साहित्य, लाखो ऊपयांची रोकड घेवून, असा 84 लाख रुपयांची फसवणूक केली.
याबाबत वयोवृध्द सुभाष कुलकर्णी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करून पहिल्या टप्प्यात दोघांना अटक केली. त्यानंतर या गुह्यात सिधुदूर्ग पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यावऊन तिला जुना राजवाडा पोलीसांनी बुधवारी अटक केली.








