उपाध्यक्षपदी हेमंत मराठे,अमित खोत; मराठी पत्रकार परिषदेकडून निवड
सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय गावकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे व अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे . मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम . देशमुख व किरण नाईक यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांनी ही निवड केली आहे.निवड झालेल्या तीनही पदाधिकाऱ्यांचे श्री टेंबकर व तालुका जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी अभिनंदन केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या सोशल मीडियाची नुकतीच स्थापना झाली आहे या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना या ठिकाणी सामावून घेण्यात येणार आहेत त्या दृष्टीने संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान याबाबतच्या सुचना श्री देशमुख व नाईक यांनी दिल्या आहेत.
त्यानुसार श्री गावकर मराठे व खोत यांची निवड करण्यात आली आहे. या पुढे तालुकास्तरावर व जिल्ह्याची उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा सोशल मीडियाचे सचिव रोहन नाईक यांनी सांगितले. दरम्यान , सोशल मीडियात काम करणाऱ्या ज्या पत्रकारांना सोशल मीडियात सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी संबधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सोशल मीडिया पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.









