सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक पतपेढी सिंधुदूर्गनगरीतर्फे महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. राज्य शासनाचा गतवर्षीचा आदर्श पुरस्कार विजेते नंदन घोगळे, गुणवंत विद्यार्थी व निवृत्त शिक्षक गुरुनाथ पेडणेकर, संतोष वैज व अन्य निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन संजय वेतुरेकर, व्हॉईस चेअरमन प्रा. सुमेधा नाईक, संचालक प्रदीप सावंत, आशिष शिरोडकर तसेच दीपक तारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









