Sindhudurg district level school table tennis tournament concluded at Malvan
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये नुकत्याच संपन्न झाल्या. सुरुवातीला मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे संचालक आणि महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशाकांत पराडकर, उत्तरेश्वर लाड, शुभम मुळीक, शशांक घुर्ये, सुजन परब, चंद्रकांत साळवे,कमलेश गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विष्णू कोरगावकर, निशाकांत पराडकर आणि कमलेश गोसावी यांनी आपल्या मनोगतातून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुलांच्या व मुलींच्या विविध गटांमध्ये स्पर्धा पार पडल्या.
मालवण / प्रतिनिधी









