सावंतवाडी प्रतिनिधी
इंडिया” या गटबंधन दौऱ्यासाठी आलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व राहुल गांधी यांनी टिळक भवन येथे भेट दिली असता त्यांचा ‘सन्मान लीडर योद्धा म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वार रूमचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले तदनंतर राहुल गांधी यांचे भाषण झाले. यामध्ये त्यांनी विशेष उल्लेख केले की ब्रिटिश काँग्रेस संपवू शकले नाहीत स्वतः संपले . त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात ,भारतामध्ये काँग्रेसमुक्त करणार असे स्वप्न बघणारे एनडीए सरकारचे अध्यक्ष मोदी सुद्धा स्वतः संपणार हे सत्य आहे . यावर सर्वांकडून जोरदार टाळ्या व घोषणा झाल्या. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व नेते , प्रमुख ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस मधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अध्यक्ष इरशाद शेख, युवा नेते श्री. समीर वंजारी, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस, श्री अरविंद मोंडकर व प्रकाश जैतापकर , पर्यावरण जिल्हाध्यक्ष बाप्पा नाटेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर ,सेवादल आनंद पवार ,जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष श्री. केतन कुमार गावडे , वैभववाडी युवक काँग्रेस भालचंद्र जाधव, वैभववाडी युवक नेते अहमद बोबडेयांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली .









