न्हावेली
होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन आंबा बागायतदार पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी प्रकाश सेनापती दळवी वय ( ७५ ) यांचे काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बांबुळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले.सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,सुना,नातवंडे एक विवाहित मुलगी,जावई असा परिवार आहे.राजकारणात आणि समाजकारणात त्यांचा सहभाग होता.दुपारी होडावडा येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.









