प्रतिनिधी
बांदा
सिंधुदुर्ग भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या सोबत महिला जिल्हा उपाध्यक्षा सावी लोके, सरचिटणीस शर्वांणी गावकर यांनी सुद्धा मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या. नितेश राणे यांना भाजापकडून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात आल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत होणार असल्याचे जिल्हाध्यक्षा कोरगावकर यांनी सांगितले.









