दुबई
येथे सुरु असलेल्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, एच एस प्रणॉय यांनी विजयी सलामी दिली. बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने तैवानच्या वेन ची स्यूचा 21-15, 22-20 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिची पुढील लढत चीनच्या जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानी असलेल्या हेन यु शी होईल.
पुरुषांच्या एकेरीतील सामन्यात किदांबी श्रीकांतने बहरीनच्या अॅडन इब्राहिमचा 21-13, 21-8 असा पराभव केला. 25 मिनिटे चाललेल्या या सामन्यात श्रीकांतने वर्चस्व गाजवले. आता त्याची पुढील लढत कोडई नाराओकाशी होईल. तसेच एचएस प्रणॉयने विजयी प्रारंभ करताना म्यानमारच्या नेईंग पेचा 21-14, 21-9 असा पराभव केला.









