वृत्तसंस्था/ रेनेस, फ्रान्स
भारताची पीव्ही सिंधू व सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी येथे सुरू झालेल्या प्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
सिंधूने इंडेनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा कडवा प्रतिकार मोडून काढत 12-21, 21-18, 21-15 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी लुकास कोरवी व रोनन लॅबार यांचा 21-13, 21-13 असा एकतर्फी पराभव केला. त्यांची पुढील लढत इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान व हेंद्रा सेतियावान यांच्याशी होणार आहे.









