ओटवणे/वार्ताहर:-
शेती बागायतीसह भरवस्तीत येणाऱ्या वन्य प्राणी व पशू पक्ष्यांना जंगलातच रोखण्याच्या दृष्टीने सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने बीजारोपण आणि वृक्षारोपण शनिवारी नरेंद्र डोंगरावर करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत जंगलातच आंबा, काजू, फणस, जांभूळ, बांबू, भेलदा माड लालभोपळा, काकडी, दोडकी, यासारखी फळे देणारी वेलजातीय झाडे यांचे बीजारोपण करण्यात आले. या बीजारोपणातून जंगलातील जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी दिवसेंदिवस वाढतच असून वन्यप्राण्यांसह पशुपक्ष्यांना जंगलातच खाद्य उपलब्ध झाल्यास त्यांचा शेती बागायतीसह भर वस्तीतील उपद्रव कमी होणार आहे. मात्र यासाठी जंगलात वृक्षारोपपणासह बीजारोपण करून वन्यप्राण्यांना जंगलातच रोखण्याचा मुख्य उद्देश आहे. या बीजारोपणातून वन्य पशुपक्ष्यांना वनांमध्ये मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने फळझाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ मिहीर प्रभुदेसाई, डॉ मुग्धा ठाकरे, भार्गवराम शिरोडकर, अनघा शिरोडकर, अँड्र्यू फर्नांडिस, प्रकाश पाटील, केदार बांदेकर, फरजिन शेख, भगवान रेडकर, रवी जाधव, आनंद मेस्त्री, दिपक गावकर, सिद्देश मणेरीकर, हुमैरा शेख, अंटोनेट फर्नांडिस, डॉ विशाल पाटील, डॉ स्वाती पाटील, डॅनियल फर्नांडिस, पारस मेस्त्री, वेदांत गावकर, दीपक गावकर, फरजिन शेख, लक्ष्मण नाईक, ऍड शामराव सावंत, सई सावंत, सौ नाईक , सौ बांदेकर, राम बांदेकर, अद्विक पाटील सीए. लक्ष्मण नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.









