न्हावेली / वार्ताहर
Sindhi Iktisha wins crown in Sindhu beauty pageant
मळेवाड येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सवात सिंधू सुंदरी 2023 या सौंदर्य स्पर्धेतील मानाचा मुकुट सिंधी इक्तिशा हिने प्रथम क्रमांक पटकावत आपल्या शिरेपेचात रोवला.मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ माळवाड कोंडुरे यांच्या वतीने मळेवाड जकात नाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 च्या भव्य पटांगणावर पाच दिवसीय भव्य युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाच्या सांगता समारंभा दिवशी सिंधू सुंदरी 2023 या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत एकूण 14 सौंदर्यवतीनी भाग घेतला होता.पहिली फेरी ही साडी फेरी होती.दुसरी वेस्टन तर तिसरी परीक्षक केली होती.प्रत्येक फेरीमध्ये सहभागी स्पर्धकांनी एकापेक्षा एक आपली अदाकारी पेश करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.परीक्षकांच्या गुगडी प्रश्नांना काही स्पर्धक ग्रीन बोर्ड झाले तर काही स्पर्धकांनी अचूक आणि अतिशय विचारपूर्वक उत्तर देत रसिकांची मने जिंकली.उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या स्पर्धेत रसिया प्रेक्षकांनी काळोखात मोबाईल टॉर्च सुरू करून दिलेला प्रतिसाद हे खास आकर्षण ठरले.अखेर सिंधूसुंदरी 2023 चा किताब सिंधी इतिशा या सौंदर्यवतीने पटकावला.तर दुसरा क्रमांक पूजा कदम,तर तिसरा क्रमांक शर्वरी नाबर हिने पटकावला.
बेस्ट स्माईल साठी श्रद्धा साठविलकर,बेस्ट कॅटवॉक साठी सानिका नागवेकर,बेस्ट हेअर स्टाईलसाठी महेक मर्चंट,उत्कृष्ट वेशभूषासाठी सिंधी इफ्तिशा,तर बेस्ट पर्सनॅलिटी साठी सानिका नागवेकर हीची निवड करण्यात आली.विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,रोख रक्कम,मानाचा मुकुट व मानाचा बेल्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेचे परीक्षणपत्रकार प्रवीण मांजरेकर,कमलेश ठाकूर व सौ मधुरा काणे यांनी केले.तर निवेदन हेमंत मराठे व शुभम धुरी यांनी केले.या बक्षीस वितरण प्रसंगी सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,स्नेहल मुळीक,खुशी कुंभार,मधुकर जाधव,अर्जुन मुळीक,सानिका शेवडे,कविता शेवडे,गुरू मुळीक,भाजप मळेवाड शक्ती केंद्र प्रमुख लाडोबा केरकर, राहुल नाईक ज्ञानेश्वर मुळीक,सचिन नाडर, सागर केरकर,हर्षद केरकर,काका सावळ,आपा काळोजी,शाण्या केरकर,अजित काळोजी,विजय चराटकर,अमित नाईक,तुषार नाईक,भाई गावडे,आधी उपस्थित होते.









