कोल्हापूर जिल्ह्यातील जनता मनाने दिलदार
कोल्हापूर:प्रतिनिधी
अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी म्हणून पदभार घेतला असला तरी यापुर्वी गडहिंग्लज येथे प्रांत म्हणून काम केले असल्याने जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहित होता. त्यामुळे तब्बल अडीच वर्षे मला जिल्ह्यातील जनतेची सेवा करता आली. आई अंबाबाईचे आशिर्वाद आणि राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझे परीने प्रामाणिक प्रयत्न केले याचे मला मनस्वी समाधान वाटते असे कृतज्ञोद्गार मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी काढले. अंतिम दिवसापर्यंत कामात व्यस्त असणाऱ्या चव्हाण यांनी सोमवारी २४ रोजी माध्यमांशी काही वेळ संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
संजयसिंह चव्हाण म्हणाले, २१ जानेवारी २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर पदी रुजू झालो. गुरूवारी २१ जुलै २०२३ रोजी माझी ॲडिशनल कंट्रोलर स्टॅम्प, मुंबई येथे बदली झाली आहे. बदली हा अधिकाऱ्याच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत शिक्षण, कृषी, आरोग्य, समाजकल्याण,दिव्यांग, महिला,बाल विकास, आरोग्य, पाणीपुरवठा अशा विविध विभागांचे काम करताना सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्याचे करीता काम करत राहीलो. राजर्षी शाहू महाराज चे बहुजनांसाठी शिक्षणाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी,व शिक्षकांसोबत काम केले. त्यांना दिशा देण्याचा, प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा कठोर भूमिका घेतली . पण वैयक्तिक स्वार्थ कोणताही नसल्यामुळे विद्यार्थी हित जोपासण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले. मनात बहुसंख्य प्रामाणिक शिक्षकांबद्दल अतीव आदर होता आणि तो कायम राहील. सर्व शिक्षक,गुरुजनांची साथ दिल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परिक्षा अशा सर्व ठिकाणी कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला यांचे मनापासून समाधान आहे.
सीईओ चव्हाण म्हणाले, जिल्हा परिषद चा मानाचा यशवंत पंचायतराज पुरस्कार माझ्या कार्यकाळात दोन वेळा कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाला. यात सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकाऱी,सर्व विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांचे यात बहुमोल योगदान आहे. राष्ट्रीय स्तरावर पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कार हा सुध्दा सर्व अधिकाऱ्यांच्या टिमवर्कचे फलित आहे. शेंद्रीय शेतीचा प्रयोग वा कृषी क्षेत्रात भरीव कामाची सुरवात केली आहे त्याचेही दृश्य परिणाम लवकरच दिसतील. शेवटी कोल्हापूर हे माझ्या आवडीचे ठिकाण आहे आणि ते सदैव ऱ्हदयात राहील. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. ही कामे आराखड्यानुसार सुरू आहेत का हे पाहणे ग्रामस्थांची जबाबदारी आहे . कारण पुढील 30 वर्षाच्या विचार करून या योजना मंजूर केल्या आहेत. वॉटर मीटर ही संकल्पना जिल्ह्यात रुजली पाहिजे. त्यानुसार प्रत्येक नळाला वॉटर मीटर बसून पाण्याचा अपव्यय