सावंतवाडी प्रतिनिधी
कलंबिस्त- राईवाडा येथील श्रीम. प्रभावती तुकाराम सावंत वय 70 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . आईच्या निधना पाठोपाठच विवाहित मुलगी संगीता ठाकूर रा- कुडाळ ,पिंगुळी तिचेही गोवा शासकीय हॉस्पिटलमध्ये अवघ्या काही तासातच निधन झाले . माय -लेकीच्या एकाच वेळी निधनाच्या वृत्ताने कलंबिस्त मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलगी संगीता ठाकूर ही आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते . उपचारादरम्यान तिचे गोवा येथे निधन झाले. तर प्रभावती सावंत यांचे कलंबिस्तयेथे वृद्धापकाळाने निधन झाले. पश्चात एक मुलगा ,विवाहित दोन मुली, सुना ,नातवंडे ,जावई असा परिवार आहे .









