वृत्तसंस्था/ बेंगळूर
सातव्या इंडियन खुल्या पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या सिमरन आणि प्रीती पाल यांची कामगिरी अप्रतिम झाली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली.
उत्तर प्रदेशच्या सिमरनने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या टी-12 गटातील क्रीडा प्रकारात 24.80 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. गुजरातच्या देमोर तेजलने रौप्यपदक तर ओडिशाच्या जानकी ओरमने कांस्यपदक मिळविले. उत्तर प्रदेशच्या प्रीती पालने महिलांच्या 200 मी. टी-35 गटातील धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. तिने या क्रीडा प्रकारात 31.40 सेकंदाचा अवधी घेतला. हरियाणाच्या अवनीने या क्रीडा प्रकारात 44.20 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर राजस्थानच्या सुनेत्राने 28.50 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.









