उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी निधीचा वापर करणार
मुंबई : बेंगळूरु येथे कार्यरत असलेली इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीमधील कंपनी सिंपल एनर्जी लवकरच आपला आयपीओ बाजारात आणण्याची योजना आखत आहे. सदरच्या आयपीओमधून कंपनी जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. सिंपल एनर्जीच्या आर्थिक वर्ष 2026-27 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत हा निधी उभारण्याचा कंपनीचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या वाहनांची मजबूत विक्री ही कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ येथे अतिशय मजबूत पकड राखली आहे.
उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर
सिंपल एनर्जी आयपीओच्या आधारे आपली उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच 2026 मध्ये 800 कोटी रुपयांच्या महसूलाचे ध्येय निश्चित केले आहे.









