वृत्तसंस्था/ कॅली (कोलंबिया)
येथे सुरू असलेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचा ऍथलिट सेल्व्हा पी. थिरुमरनने पुरुषांच्या तिहेरी उडीत रौप्यपदक पटकाविले.
17 वषीय सेल्व्हाने या क्रीडा प्रकारात 16.15 मीटरचे अंतर नोंदवून दुसऱया क्रमांकासह रौप्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात जमैकाचा ऍथलिट जेडॉन हिबर्टने 17.27 मीटरचे अंतर नोंदवित सुवर्ण तर इस्टोनियाच्या व्हिक्टर मोरोझोव्हने कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने 4ƒ400 मीटर रिलेमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. या क्रीडा प्रकारात भारतीय रिले संघात सुमी, प्रिया, रजिता आणि रुपल यांचा समावेश आहे. 2016 साली पोलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताचा भालफेकधारक निरज चोप्राने सुवर्णपदक पटकाविले होते. कॅलीमधील या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 3 पदकांची कमाई केली असून यामध्ये 2 रौप्य आणि 1 कास्य पदकाचा समावेश आहे.









