राज्यस्तरीय स्कूल ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा
बेळगाव : बेंगलोर येथे कर्नाटक राज्य स्कूल ऑलंम्पिक संघटना आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय स्कूल ऑलिfिम्पक स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश राजेश नाईक याने 14 वर्षाखालील गटात 2 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले. बेंगलोर येथे साई स्पोर्ट्स क्लब व यंगस्टार स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्कूल ऑलिfिम्पक स्पर्धेत राज्यात जवळपास 3 हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगावतील चव्हाट गल्लीच्या सर्वेश राजेश नाईक याने या स्पर्धेत भाग घेत 2 हजार मीटर लाँग रनिंग स्पर्धेत रौप्य पटकाविले. तो महिला विद्यालय येथे आठवी येथे शिकत असून त्याला क्रीडा शिक्षक विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर त्यांच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले आहे. सर्वेश नाईक हा ज्योती स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असून ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे.









