वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थायलंडमध्ये झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई कनि÷ांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू उन्नती हुडा आणि अनिश थोपानी यांनी रौप्यपदके मिळविली.
या स्पर्धेत पुरुष दुहेरीत खेळणाऱया भारताच्या अर्श मोहम्मद आणि संस्कार सारस्वत या जोडीने 3 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे. महिला एकेरीच्या 17 वर्षांखालील वयोगटातील अंतिम लढतीत ओदिशाच्या उन्नती हुडाला अंतिम लढतीत थायलंडच्या व्हिटिडेसमकडून पराभव पत्करावा लागला. व्हिटिडेसमने हा अंतिम सामना 21-18, 9-21, 21-14 अशा गेम्समध्ये जिंकून सुवर्णपदक पटकाविले. 15 वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या एकेरीत चुंग हेसेंगने अनिशचा 21-8, 22-24, 21-19 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेत 15 वर्षांखालील वयोगटामध्ये यापूर्वी भारताच्या ज्ञाना दत्तूने कांस्यपदक तर बिजॉर्न जेसन आणि श्रीनिवास यांनी दुहेरीत कांस्यपदक मिळविले होते.









