वृत्तसंस्था/ ऍस्टाना
रविवारी येथे झालेल्या आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ज्योती येराजी आणि जस्विन ऍल्ड्रेन यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक पटकाविले.
या स्पर्धेत महिलांच्या 60 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत भारताची महिला धावपटू ज्योती येराजीने 8.13 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात जपानच्या अओकीने 8.01 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या लाब उडी या क्रीडा प्रकारात भारताच्या जस्विन ऍल्ड्रेनने 7.97 मी. आंतर नोंदवित रौप्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात चीन तैपेईच्या लॉन तेंगने 8.02 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेमध्ये शनिवारी भारताच्या पवित्रा वेंकटेश आणि रोझी मिना यांनी महिलांच्या पोल व्हॉल्ट या क्रीडा प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळविले होते. या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकूण 4 पदकांची कमाई केली. पुरुषांच्या गोळाफेकमध्ये भारताच्या तेजिंदरपाल सिंग तूर याने सुवर्णपदक तर या क्रीडा प्रकारात भारताच्या करणवीर सिंगने रौप्यपदक घेतले होते. तिहेरी उडीत भारताच्या प्रविण चित्रावेलने तसेच पेंथेलॉन या क्रीडाप्रकारात भारताच्या स्वप्ना बर्मन यांनी पदके मिळविली.









