पॅरा बॅडमिंटनमधील भारताचे चौथे पदक
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा पॅराबॅडमिंटनपटू सुहास यतिराजला पुरुषांच्या एसएल 4 प्रकारातील अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे एकूण 12 वे तर पॅरा बॅडमिंटनमधील चौथे पदक आहे.
अंतिम लढतीत यतिराजला फ्रान्सच्या लुकास माझुरकडून 0-2 (9-21, 13-21) असा पराभव स्वीकारावा लागला. टोकियो पॅरालिम्पिकमध्येही त्याने रौप्य मिळविले होते. विशेष म्हणजे त्यावेळीही त्याला माझुरकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. 41 वर्षीय सुहास हा 2007 बॅचचा आयएएफ ऑफिसर असून अंतिम लढतीत त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्याच्या डाव्या घोट्याला व्यंग असून यामुळे त्याच्या हालचालीवर परिणाम होतो.









