वृत्तसंस्था/ अल्मेटी (कझाकस्तान)
येथे झालेल्या फिडेच्या विश्व ब्लिझ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची महिला ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीने शानदार कामगिरी करत महिलांच्या विभागात रौप्यपदक पटकाविले.
दोन दिवसांपूर्वी या स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पीने 17 व्या आणि शेवटच्या फेरीत अव्वल प्रतिस्पर्धी झोनगेई तेनचा पराभव करत रॅपिड विभागातील अजिंक्मयपद पटकाविले होते. 35 वषीय कोनेरू हम्पीने ब्लिझ या प्रकारात पहिल्या नऊ फेऱयांमध्ये चार लढती जिंकल्या. या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी हम्पीने सात डाव जिंकले. तर चौदाव्या फेरीतील डावात तिने भारताच्या द्रोणावली हरिकाला बरोबरीत राखले होते. तिने 12.5 गुण घेत या स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. कझाकस्तानची बिबीशेरा बेलाबायेव्हाने 13 गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कोनेरू हम्पी ही विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतील माजी विजेती आहे. तिने विश्व ब्लिझ बुद्धिबळ स्पर्धेत महिलांच्या विभागात आठ सामन्यातून 7.5 गुण घेत रौप्यपदक मिळविले. महिलांच्या विश्व ब्लिझ बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीचे हे पहिले रौप्यपदक आहे. द्रोणावली हरिकाने या स्पर्धेत 10.5 गुणांसह तेरावे स्थान मिळविले. तर पद्मिनी राऊतने 17 वे, तानिया सचदेवने 21 वे स्थान मिळविले आहे. बुद्धिबळ रॅपिड प्रकारात कांस्यपदक मिळविणारी भारताची सविता श्री हिला ब्लिझ प्रकारात 9.5 गुणांसह 33 व्या स्थानावर समाधाने मानावे लागले.
या स्पर्धेत खुल्या विभागात नॉर्वेचा ग्रॅण्डमास्टर टॉप सीडेड मॅग्नस कार्लसनने 16 गुणांसह विजेतेपद मिळविले आहे. या गटात भारताच्या एकाही बुद्धिबळपटूला पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले नाही. अनुभवी पी. हरिकृष्णाने 13 गुणांसह 17 वे स्थान, तर निहाल सरिनने 18 वे स्थान मिळविले. नॉर्वेचा ग्रॅण्डमास्टर कार्लसनने फिडेच्या या स्पर्धेत ब्लिझ आणि रॅपिड या दोन्ही विभागातील अजिंक्मयपदे मिळविली आहेत.
विश्व ब्लिझ स्पर्धेतील भारताची कामगिरी
महिला- कोनेरू हम्पी 12.5 गुणांसह दुसरे स्थान, डी. हरिका 10.5 गुणांसह तेरावे स्थान, पद्मिनी राऊत 10.5 गुणांसह 17 वे स्थान, तानिया सचदेव 10 गुणांसह 21 वे स्थान, बी. सविता श्री 13 गुणांसह 18 वे स्थान, पुरुष- अर्जुन इरिगेसी 12 गुणांसह 42 वे स्थान, बी. अदिबन 12 गुणांसह 49 वे स्थान, व्ही. प्रणव 11.5 गुणांसह 58 वे स्थान, सी. अरविंद 11.5 गुणांसह 60 वे स्थान, सूर्यशेखर गांगुली 11 गुणांसह 12 वे स्थान, रौनक साधवानी 10.5 गुणांसह 83 वे स्थान, विदित गुजराती 10.5 गुणांसह 90 वे तसेच एस. एल. नारायणन 10.5 गुणांसह 92 वे स्थान.









