प्रतिनिधी /बेळगाव
दैवज्ञ ब्राह्मण संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन केले होते. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम पार पडले. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे दैवज्ञ ब्राह्मण संघाचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष राजू बेकवाडकर, प्रमुख पाहुणे मंजुनाथ कलघटकर, हेमंत मुतगेकर, नितीन कलघटकर, दयानंद कारेकर यांच्या उपस्थितीत झाले. मंगळवारी सकाळी चित्रकला स्पर्धा, दुपारी फॅन्सी डेस स्पर्धा, मुले-मुली व महिलांसाठी नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या 12 जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.
बुधवारी सकाळी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी पाककला व मेहंदी स्पर्धा पार पडल्या. सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी स्वरसंध्या ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. यावेळी दैवज्ञ ब्राह्मण संघाचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









