वृत्तसंस्था/ हाँगझोऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धीबळ या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सांघिक प्रकारात प्रत्येकी एक रौप्यपदक पटकाविले.
पुरुषांच्या सांघिक प्रकारातील नवव्या फेरीमध्ये भारताने फिलिपिन्सचा 3.5-0.5 असा पराभव करत रौप्यपदक मिळविले. तर महिलांच्या सांघिक प्रकारात भारताने कोरिया प्रजासत्ताकचा पराभव करत रौप्यपदक पटकाविले. चीनने महिलांच्या विभागात आघाडीचे स्थान घेत सुवर्णपदक तर भारताने रौप्य तसेच कझाकस्थानने कांस्यपदक पटकाविले. पुरुषांच्या सांघिक प्रकारात इराणने सुवर्णपदक, भारताने रौप्य तर उझवेकने कांस्यपदक मिळविले.









