वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस
येथे सुरु असलेल्या 16 व्या विश्व ब्रिज ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या वरिष्ठ ब्रिज संघाने रौप्यपदक पटकाविले. सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत अमेरिकेच्या वरिष्ठ ब्रिजपटूनी भारताचा 258-165 अशा गुणांनी पराभव केला.
या स्पर्धेत कमल मुखर्जी, विभास तोडी, बादल दास, प्रणब बारदान, अरुण बापट, रवी गोयंका आणि गिरीश बिजुर (बहिस्थ कर्णधार) यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 26 बोर्डवरील हा अंतिम सामना 6 टप्प्यांमध्ये दोन दिवस चालला होता. अंतिम सामन्यातील पहिल्या दोन टप्प्यांमध्ये दोन्ही संघामध्ये चांगली चुरस पहावयास मिळाली. त्यानंतर अमेरिकेने भारताचा 53-7 असा पराभव करत तिसरा टप्पा जिंकला. त्यानंतर मात्र अमेरिकन ब्रिजपटूंनी मागे वळून न पाहता या स्पर्धेचे सुवर्णपदक हस्तगत केले.









