वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकन क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी शमी सिल्वा यांची फेरनिवड करण्यात आली. सोमवारी येथे झालेल्या लंकन क्रिकेट मंडळाच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये सिल्वा यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शमी सिल्वा आता सलग चौथ्यांदा लंकन क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद भूषवित आहेत.
2025-27 या दोनवर्षांच्या कालावधीकरिता लंकन क्रिकेट मंडळाच्या कार्यकारिणीची निवड या बैठकीत करण्यात आली. शमी सिल्वा यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. शमी सिल्वा हे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते. गेल्या डिसेंबरमध्ये आशियाई क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी शमी सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी हे पद जय शहा भूषवित होते. दरम्यान त्यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.









