प्रतिनिधी
बांदा
तेरेखोल नदीपात्रात असणाऱ्या गाळामुळे पावसाळ्यात बांदा, इन्सुली, शेर्ले, वाफोली सह अन्य गावात पुरस्थिती निर्माण होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसानीला सामोरे जावे लागते. नदीपात्रात असणाऱ्या गाळामुळे पूर येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते त्यानुसार बांदा, इन्सुली, वाफोली व शेर्ले ते आरोसबाग नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु केले आहे. सदर कामाची शासनाकडुन अधिकृतपणे परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आले. पावसाळा तोंडावर आला असुन तेरेखोल नदीपात्रात असणारा गाळ लवकरात लवकर बाहेर काढा. जेणेकरून पुरस्थिती निर्माण होणार नाही. यासाठी शासनाने दिलेल्या नियमानुसार गाळ उपसा करा असे आवाहन यावेळी श्री. दळवी यांनी केले. तेरेखोल नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात बांदा परिसरात पुरस्थिती निर्माण होते. स्थानिकाच्या मागणीनुसार शासनाच्या वतीने गाळ काढण्याची परवानगी देण्यात आली. आज सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते इन्सुली तेरेखोल नदीपात्रात तुळसाण पुलानजीक श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप बांदा मंडलचे माजी तालुकाध्यक्ष महेश धुरी, माजी जि प सदस्य उन्नती धुरी, माजी सभापती मानसी धुरी, डेंगवे माजी सरपंच मधुकर देसाई, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, बांदा माजी उपसरपंच बाळू सावंत, अशोक सावंत, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, रोणापाल उपसरपंच योगेश केणी, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, विकास केरकर, नारायण कांबळी, उमेश पेडणेकर, निलेश कदम, गुरुदत्त कल्याणकर, अंकित धाऊस्कर, ओंकार प्रभू आजगावकर, संतोष धुरी, आबा धुरी, लाडोजी जाधव, उल्लास परब आदी सह बांदा,इन्सुली, शेर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









