वृत्तसंस्था/ हरारे
यजमान इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकमेव कसोटी सामना 22 मे रोजी ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळविला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी झिम्बाब्वेने घोषित केलेल्या 15 सदस्यांच्या संघामध्ये अष्टपैलू सिकंदर रझाचा समावेश करण्यात आला आहे. सिकंदर रझाचे बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन होत आहे. या सामन्यासाठी क्रेग इर्व्हिनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. 2003 नंतर पहिल्यांदाच झिम्बाब्वेचा संघ इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना खेळत आहे.
झिम्बाब्वे संघ – क्रेग इर्व्हिन (कर्णधार), बेनेट, बेन करेन, ट्रेव्हर गेवांदू, क्लाइव्ह मदांडे, वेस्ले मधव्हेरे, वेलिंग्टन मासाकेझा, मुझारबनी, रिचर्ड निगरेव्हा, न्यूमन नेमहुरी, व्हिक्टर नेयायुची, सिकंदर रझा, टी. सिगा, निकोलास वेल्च आणि सिन विलियम्स.









