15 बंकर केले नष्ट : लोकांनी जमा केली हजारो शस्त्रास्त्रs
वृत्तसंस्था/इंफाळ
हिंसाप्रभावित मणिपूरमध्ये लुटण्यात आलेली आणि अवैध स्वरुपात बाळगण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांना स्वेच्छेने सोपविण्याच्या दोन आठवड्यांच्या कालमर्यादेदरम्यान लोकांनी सुरक्षा दलांना दारूगोळ्यासमवेत एक हजाराहून अधिक शस्त्रास्त्रs सोपविली आहेत. पोलिसांनी कालमयांदा समाप्त झाल्याच्या एक दिवसाने म्हणजेच शुक्रवारी ही माहिती दिली आहे. परंतु हा आकडा तात्पुरता आहे आणि इंफाळमध्ये अधिकाऱ्यांकडे सर्व जिल्ह्यांमधून तपशील पोहोचल्यावर सोपविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची संख्या वाढणार आहे. मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. लोकांकडून जमा करण्यात आलेली शस्त्रास्त्रांमधून लुटण्यात आलेली आणि अवैध स्वरुपात खरेदी करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचे अधिकारी वर्गीकरण करणरा आहेत. समर्पण कालावधीदरम्यान इंफाळ खोऱ्यातील 5 जिल्हे, पर्वतीय भागांमधील जिल्हे आणि जिरीबामध्ये लोकांकडून सुमारे 1023 शस्त्रास्त्रs सोपविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
ईशान्येतील या राज्याचे उर्वरित जिल्हे नागाबहुल असून तेथे 3 मे 2023 पासून हिंसेची घटना घडल्याची माहिती समोर आलेली नाही. अन्य 11 जिल्ह्यांमध्ये 3 मे 2023 पासून आतापर्यंत मैतेई आणि कुकी समुदायादरम्यान झालेल्या संघर्षात कमीतकमी 250 लोक मृत्युमुखी पडले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. पर्वतीय क्षेत्र कुकी समुदाय बहुल असून खोऱ्यात मैतेई समुदायाच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ल यांनी 20 फेब्रुवारी रोजी लोकांना सुरक्षादलांकडून लुटण्यात आलेली शस्त्रास्त्रs आणि अवैध स्वरुपात बाळगलेल्या अन्य शस्त्रास्त्रांना 7 दिवसांच्या मुदतीत स्वेच्छेने जमा करण्याचे आवाहन केले होते. पर्वतीय अन् खोरे दोन्ही क्षेत्रांच्या लोकांकडून अतिरिक्त मुदतीची मागणी करण्यात आल्यावर कालमर्यादा 6 मार्चच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती.
संबंधित कालावधीत शस्त्रास्त्रs जमा करणाऱ्या लोकांच्या विरोधात कुठलीच दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन प्रशासनाने लोकांना दिले होते. शस्त्रास्त्रs जमा करण्याची ही मुदत सर्वांसाठी शांतता, सांप्रदायिक सौहार्द आणि आमच्या युवांचे भविष्य तसेच आमच्या समाजाच्या सुरक्षेत योगदान देण्याची ही अंतिम संधी असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. लोकांकडून सोपविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये 9 एमएम पिस्तुल, सब-मशीन गन (एसएमजी), कोल्ट-मशीन गन (सीएमजी), सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर), स्नायपर, चिनी ग्रेनेड, इंसास आणि एके56 रायफल सामील असल्याचे अधिकाऱ्याकडुन सांगण्यात आले. याचबरोबर लोकांनी मागील दोन आठवड्यांदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, रेडिओ सेट, गणवेश, स्थानिक स्वरुपात निर्मित मोर्टार (पोम्पी) यासारखी सामग्री देखील सोपविली आहे. स्वेच्छेने शस्त्रास्त्र सोपविण्याची मुदत समाप्त झाल्यावर सुरक्षा दलांनी राज्याच्या विविध हिस्स्यांमध्ये शोध मोहीम राबवत 36 शस्त्रास्त्रs, दारुगोळा, स्फोटके आणि 21 अन्य वसतू हस्तगत केल्या तर 15 अवैध बंकर नष्ट केले आहेत असे पोलिसांनी म्हटले आहे. एन. विरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर केंद्राने 13 फेब्रुवारी रोजी राज्यात राष्ट्रपती शासन लागू केले होते.









