खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत आज होणार समारोप
बेळगाव : केएलईच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या ‘द व्हिजन कर्नाटक 2025’ या प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी आठ हजार बेळगावकरांनी भेट दिली. प्रदर्शनाचा शुक्रवार दि. 13 जून रोजी खासदार शेट्टर यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. बेळगावतील विविध शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद लुटला. पहिल्या दिवसाच्या लक्षणीय प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, पालक, बेळगावातील व्यापारी, उद्योजकांनी प्रदर्शनाला भेट देऊन समाधान व्यक्त केले. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता समारोप होणार असून यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









