वृत्तसंस्था/ मुंबई
2023-24 सालातील आयएसएल चॅम्पियन्स मुंबई सिटी एफसी संघाने केरळचा आघाडी फळी खेळणारा फुटबॉलपटू पी. एन. नौफल बरोबर 3 वर्षांच्या कालावधीसाठी नवा करार केला आहे. शनिवारी मुंबई सिटी संघातर्फे ही घोषणा करण्यात आली.
23 वर्षीय नौफलने आपल्या फुटबॉल प्रवासाला बास्को एफसी संघामार्फत प्रारंभ केला. 2022 साली तो गोकुळाम केरळ एफसी संघात दाखल झाला. नौफल हा आघाडी फळीतील अव्वल फुटबॉलपटू आहे. 2027 च्या फुटबॉल हंगामापर्यंत तो मुंबई सिटी एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करेल. गोकुळाम केरळ एफसी संघाकडून त्याने 53 सामन्यात 5 गोल नोंदविले आहेत.









