फॅब चषक सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोदराज स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत फॅब चषक निमंत्रितांच्या वरिष्ठ सेवेन-ए-साईड फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात झालेल्या सामन्यातून सिग्नेचर्स संघाने साईराज वॉरिअरचा, राहुल के.आर. शेट्टी संघाने भारत एफसीचा, टेनटेन एफसीने डिसाईडर एफसीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळवले. तर ओल्ड फाटा संघाला ग्रो स्पोर्ट्स संघाने बरोबरीत रोखले. येथील सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरियानाच्या तर्फ फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सिग्नेचर्स एसीने साईराज वॉरिअरचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिला सत्राच्या 13 व्या मिनिटाला मुस्ताकच्या पास वर अल्तमशने गोल करून 1-0 ची आघाडी सिग्नेचर्स संघाला मिळवून दिली. सामन्याची 28 व्या मिनिटाला अल्तमासच्या पासवर मुस्ताकने सुरेख गोल करून सिग्नेचर्स संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी संघाने भारत एफसी संघाचा 2-0 असा पराभव केला.
सामन्याच्या 8 व्या मिनिटाला राहुल के. आर. शेट्टीच्या प्रज्वलच्या पासवर मिथीलने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला मिथीलच्या पासवर प्रज्वलने गोल करून 2-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात टेन टेन एफसीने डिसायडर एफसीचा 3-1 असा पराभव केला. सामन्याच्या 7 व्या मिनिटाला टेन टेन एफसीच्या अनिकेतच्या पासवर धनिष्कने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 12 व्या मिनिटाला डिसायडरच्या अलोकच्या पासवर कृष्णाने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. 20 व्या मिनिटाला टेन टेन एफसीच्या राहुलने दुसरा गोल केला. तर 25 व्या मिनिटाला धनिष्कच्या पासवर अनिकेतने तिसरा गोल करून 3-1 ची आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात कोल्ड पाटाज एफसीला ग्रो स्पोर्टसने 1-1 अशा बरोबरीत रोखले. सामन्याच्या 11 व्या मिनिटाला कोल्ड पाटाजच्या संकेतच्या पासवर प्रत्तुंबने गोल करून 1-1 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 23 व्या मिनिटाला ग्रो स्पोर्टसच्या तेजने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला.









