केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोट्स क्लब सी संघाने 5 धावानी, सिग्निचर स्पोर्ट्स क्लब अ संघाने हिंडाल्को संघाचा 204 धावानी तर चॅलेंजर निपाणी संघाने इंडियन बॉईज संघाचा 5 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. संतोष चव्हाण व भरत गाडेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सकाळी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिग्नेचार संघाने प्रथम फलांदजी करताना 30 षटकात 4 गडी बाद 280 धावा केल्या. त्यात संतोष चव्हाणने 16 षटकार व 12 चौकारासह 186 धावा करून शतक झळकाविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिंडाल्को संघाचा डाव 20.5 षटकात 76 धावात आटोपला. दुसऱ्या सामन्यात इंडियन बॉईज अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात सर्व गडी बाद 101 धावा केल्या. चॅलेंजर निपाणीतर्फे श्रेयस मातीव•रने 24 धावात 5, संदेश पाटीलने 2 तर विनायक व ओम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर युथ स्पोट्स निपाणीने 15.1 षटकात 5 गडी बाद 105 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला.









