बेळगाव : शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा यंदे खूटजवळील सिग्नल यंत्रणा गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे. वास्तविक हा अत्यंत वर्दळीचा सततच्या वाहतुकीचा असा महत्त्वाचा रस्ता आहे. मुख्य म्हणजे समादेवी गल्ली, बेननस्मिथजवळचा रस्ता, संभाजी चौकातून चन्नम्मा सर्कलकडे जाण्याचा रस्ता किंवा तेथून संभाजी चौकात येणारा रस्ता असून चार रस्ते जोडणारा हा अत्यंत असा महत्त्वाचा रस्ता आहे. सततची होणारी वाहतूक लक्षात घेता येथे सिग्नल अत्यावश्यक आहे. परंतु गेल्या 15 दिवसांपासून हा सिग्नल बंद आहे. वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असले तरी त्यांचा कामाचा वेळ संपल्यानंतर येथे वाहतूक नियंत्रित करण्यास कोणीच नसते. त्यामुळे वाहनधारक कशाही पद्धतीने वाहन पुढे दामटतात. येथील गर्दी लक्षात घेऊन सिग्नल त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
Previous Articleचिखले गावात गव्यांचा धुमाकूळ
Next Article चन्नम्मा चौकातील ‘तो’ खड्डा बुजविण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









