आज सकाळी जिल्ह्यात २ ठिकाणी जवळपास ४० गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास राक्षी ते धबधबेवाडी गावाच्या दरम्यान पावनगडाच्या पायथ्याकडे जवळपास 25 ते 30 गवा रेड्यांच्या कळपाचे जाताना नागरिकांना दर्शन झाले. तर भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील भुतोबा पठारावरील माळरानावर जवळपास १५ गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले.गवे पाहण्यासाठी रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांची गर्दी जमली होती. रात्री अपरात्री वगळता आता दिवसाढवळ्या ही गव्यांचे दर्शन होत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये व परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण झाले आहे. गव्यांच्या बंदोबस्ताच्या दृष्टीने वनखात्याकडून काहीतरी उपाययोजना होण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Previous Articleसलमान और तू फिक्स; मुसेवाला टाईप मारेंगे…
Next Article बेळगाव-जोतिबा थेट बससेवा









