कोल्हापूर / प्रतिनिधी :
कोल्हापुरात गेल्या दीड महिन्यांपासून सात गवारेड्यांच्या कळपांचा मुक्काम आहे. सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा ढेरेकर मळ्यात सात गवा रेड्यांच्या कळपाचे दर्शन झाले. गेल्या महिनाभरापासून वनविभागाच्या पथकाला हा कळप हुलकावणी देत आहे. मात्र, शेतकरी आणि शेतमजूर गवारेड्याच्या धास्तीने भयभीत झाला आहे. तर दुसरीकडे नैसर्गिक अधिवासात गवारेडे परतल्याची वनविभागाची बतावणी हवेतच सुरू असल्याचे पाहायला मिळते.









