दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा यश
वृत्तसंस्था/ अमृतसर
भारत-पाकिस्तान सीमेदरम्यान मागील काही दिवसांपासून बंद झालेल्या ड्रोनच्या हालचाली पुन्हा वाढू लागल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पंजाबमधील सीमेवरून ड्रोन हस्तगत झाला आहे. हा ड्रोन रविवारी सुरक्षा समित्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर जप्त करण्यात आला आहे. बीएसएफने हा ड्रोन अमृतसर जिल्ह्यातील सीमावर्ती गाव कक्कड येथून ताब्यात घेतला आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने याकरता शोधमोहीम हाती घेतली होती.
काही दिवसांपूर्वी तरनतारन जिल्ह्यातील राजोके गावातून ड्रोन जप्त करण्यात आला होता. हे ड्रोन पाकिस्तानी तस्कर हेरॉइनची खेप भारतात पाठविण्यासाठी वापरत असतात. मागील महिन्यात पंजाबच्या सीमेवर एकूण 8 ड्रोन ताब्यात घेण्यात आले होते.









