बेळगाव – कर्नाटकात मराठा समाजाला 3 बी मधून 2- ए मध्ये आरक्षण मिळावे या मागणीच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा फेडरेशन आणि सकल मराठा समाज यांच्यातर्फे सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येथे मंगळवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्ण विधान सौधला सभेला घेराव घालून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी दिली.
बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाचे परमपूज्य मंजुनाथ स्वामीजी, श्यामसुंदर गायकवाड आदींसह कर्नाटकातील अनेक आमदार व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकल मराठा 3 – बी मधून 2 – ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करत आहोत. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. बेळगावत उद्यापासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येथे २० डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव करण्यात येणार असून आंदोलनात बेळगाव शहर व राज्यातील २५ हजारहून अधिक मराठा समाज बांधव सहभागी होतील अशी अपेक्षा आहे असे जाधव यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









