बेळगाव – प्रत्यक्ष देवाचे स्वरूप म्हणून संबोधले जाणारे विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्वेश्वर स्वामीजी (82) यांचे सोमवार दिनांक ०२ जानेवारी रोजी देहावसान झाले.
साधपणाने आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून, समाज कल्याणासाठी नेहमी महत्वपूर्ण कार्य करीत होते.
आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या भक्तपरिवारात प्रचंड दुःखाचे वातावरण आहे .
त्यांचे पार्थिव विजापूर येथील सैनिक स्कूल मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून आज सायंकाळ पर्यंत विजापूर येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे . या प्रसंगी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि इतर राज्यातून त्यांचे भक्तगण लाखोंच्या संख्येत उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने योग्य ती काळजी घेऊन बंदोबस्त वाढविला आहे.









