प्रतिनिधी
बांदा
बांदा उभाबाजार येथील मारुती मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश शिरोडकर, उपाध्यक्ष बाबुराव धारगळकर तर खजिनदार सर्वेश येडवे/साई पावसकर यांची निवड करण्यात आली. सोमवारी 21 रोजी झालेल्या सभेत ही निवड सर्वानुमते करण्यात आली. तर गणेशोत्सवाचे नियोजन सभेत करण्यात आले.
डेकोरेशन साठी साई केसरकर, बाबा येडवे, मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, सर्वेश येडवे यांना सर्वांनी डेकोरेशनसाठी सहकार्य करावे. गणपतीची आरती ठीक 10 वा होईल सर्वांनी नोंद घ्यावी. गणपती आगमनासाठी सर्वांनी सकाळी 11.00 वा जमावे. गणपती आगमनासाठी लागणारी त्या गाडीचे सजावटीचे काम अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार करण्याचे ठरविले. ज्ञानेश्र्वर येडवे सिद्धेश येडवे, बाबल नार्वेकर, बाबल येडवे, नितेश पेडणेकर, दादा पावसकर, मनोज कल्याणकर, बाबुराव धारगळकर, काका कारेकर, प्रसाद मिसाळ,प्रसन्न पावसकर आदी या बैठकीला उपस्थित होते









