नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय विमा महामंडळाच्या (एलआयसी) अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती 2 वर्षांसाठी करण्यात आली आहे. सध्या ते याच महामंडळाच्या चार व्यवस्थापकीय संचालकांपैकी एक आहेत. गेल्या मार्चमध्येच त्यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मावळते अध्यक्ष एम. आर. कुमार यांचा सेवाकाळ 13 मार्च 2023 ला संपला आहे. त्यानंतर मोहंती हेच अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित होते. शुक्रवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. यापूर्वी त्यांनी एलआयसीमध्ये मुख्य क्रियान्वयन अधिकारी म्हणून उत्तरदायित्व निभावले आहे.









