प्रदीर्घ चर्चेनंतर पक्षश्रेष्टींकडून सिद्धरामय्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब
राज्यात १३५ जागांसह काँग्रेसपक्ष बहुमताने सत्तेवर आले मात्र, मागील ४ दिवसांपासून मुख्यमंत्री निवडीचा निर्णय काँग्रेस हायकमांडसाठी डोकेदुखीचा विषय ठरला होता. एकीकडे सिद्धरामय्या आणि डिके शिवकुमार यांच्या नावांची चर्चा घोळत होती.
प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर सिद्धरामय्या यांची निवड मुख्यमंत्रीपदासाठी करण्यात आली असून तसेच उपमुख्यमंत्रीपदी डि के शिवकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शनिवार दि २० मे रोजी बेंगळूर येथे शपतविधीचा कार्यक्रम होणार आहे.
पत्रकारांशी बोलताना डिके शिवकुमार म्हणाले, लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. पक्षश्रेष्टी आणि पक्षाच्या अध्यक्षांच्या निर्णयाचे मी सन्मान करतो. पक्षाच्या हितासाठी पक्षश्रेष्टींनीं घेतलेल्या समीकरणाला मी कटिबद्ध आहे. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या असून कर्नाटकाच्या जनतेला दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू.









